पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करून देशभरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान भोसरी येथे घडली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर नारायण कुलकर्णी (धावडे वस्ती, पीएमपीएल चौकाजवळ, भोसरी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडून सायबर गुन्हेगारांच्या टोळीशी संगणमत केले. त्या खात्याच्या माध्यमातून भारतातील ९ नागरिकांची २१ हजार ६०६ रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
बँकेच्या खात्यावरून नागरिकांची फसवणूक
