पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापरू दिल्याचा आणि चेकद्वारे ११ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती.
पेन्नी हेन्री पॉवेल (धारक: UCO Bank खाते क्र. 19700210005231) आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्रीकांत सुनील कबुले (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पेन्नी हेन्री पॉवेल हिने स्वतःच्या नावे यूको बँकेत खाते उघडले. सायबर गुन्हेगार टोळीची सभासद बनून तिने हे खाते सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले. यामध्ये तीन विविध तक्रारदारांचे सायबर फसवणुकीतील एकूण ११ लाख रुपये या खात्यात जमा करून ते चेकद्वारे काढून फसवणूक केली. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
बँक खाते वापरण्यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक
