इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही चोरी दि. २० जुलै रोजी सायंकाळी ८:०० ते दि. २१ जुलै रोजी सकाळी ०७:०० या वेळेत पिंपळे गुरव येथील जवळकरनगर परिसरात घडली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत खेमा वडेकर (वय ३८, रा. सुवर्णयुग कॉलनी, जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली ४० हजार रुपये किंमतीची काळया रंगाची होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी (क्र. MH14JD 2434) ही अशोक विहार शेजारील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *