पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – क्रेनच्या धडकेने एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथील बालाजीनगर चौकात मंगळवारी (दि. 23 जून) रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली आहे.
क्रेन चालक सरताज इरसाद अहमद (वय 35, रा. नढेनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल दुर्गादास चौगुले (वय 32, रा. भोसरी) यांनी बुधवारी (दि. 24 जून) रोजी भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील दुर्गादास चौगुले हे रस्ता ओलांडत असताना भरधाव क्रेनने त्यांना समोरून धडक दिली व चाक अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्रेनच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
