​तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन करून थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरासमोर कोयत्यासह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
विजय राहुल तलवारे (वय २३, रा. काळेवाडी) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश खेडकर (वय ३४) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो बंदी आदेशाचा भंग करून, बेकायदेशीरपणे स्वतःजवळ कोयता बाळगून फिरत असताना पोलिसांना मिळून आला. ​पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *