pimpri chinchwad-फाइव्‍ह स्टार हॉटेल रेटिंग टास्कच्या आमिषाने पावणेतीन लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – एका महिलेला फाइव्‍ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या ऑनलाइन टास्कमधून दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० मे रोजी थरमॅक्स कंपनी, आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत पिडित महिलेने शनिवारी (दि. २० जून) रोजी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिला फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

फाइव्‍ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभाग घेतल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला वेगवेगळ्या युपीआय आयडीवर रक्कम पाठविण्यास सांगून एकूण दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *