सरकारी नोकरीचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात ज्युनिअर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोन महिलांची सात लाख ४५ हजार रुपयांची ५०० फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान किवळे येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने रविवारी (दि. ३ मे) रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुशी वसंतराव देशमुख (रा. बिजली नगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेला येरवडा जेल विभागात ज्युनिअर क्लार्क पदावर आणि तिची मैत्रीण तृप्ती निलेश दैठनकर यांना सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी लावण्याचे प्रलोभन दिले. यासाठी आरोपीने वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण ७ लाख ४५ हजार ५०० रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *