लिंक्डइन आणि टेलिग्रामद्वारे 36 लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला 36 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना बावधन येथे 6 मे ते 4 जून 2026 या कालावधीत घडली आहे.
नील जिंदल (लिंक्डइन व टेलिग्राम आयडीधारक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका पुरुष फिर्यादीने बुधवारी (दि. 25 जून) रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि नफा किंवा मुद्दल परत न करता फसवणूक केली. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *