सायबर टोळीला बँक खाते पुरवून सव्वा कोटींची फसवणूक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – चाकण हद्दीत बँक खात्याचा गैरवापर करत देशभरातील 7 नागरिकांची एक कोटी 23 लाख 73 हजार 561 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान घडला.
पोलीस शिपाई उमेश बळीराम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. किशन मनोज राजभर (रा. सद्गुरुनगर, नाणेकरवाडी, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून तब्बल एक कोटी 23 लाख 73 हजार 561 रुपयांचे आर्थिक व्यवहार केले. सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते पुरवल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत.