दोन लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

​पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड येथील कस्पटे वस्ती रोडवर शासनाने प्रतिबंधित केलेल्‍या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकावर गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाईसोमवारी दुपारी पावणे चार वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
पोलीस शिपाई ज्ञानदेव मुरलीधर झेंडे (वय ४२) यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय ३२, रा. आण्णाभाऊ साठे नगर, वाकड) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथील लक्ष्मी मोटर्सच्या मागे एका पत्र्याच्या खोलीत आरोपीने आरोग्यास घातक असलेला पानमसाला व गुटखा लपवून ठेवला होता. पोलिसांनी छापा टाकून दोन लाख, आठ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *