पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या समोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ८ जून) रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई रवि प्रकाश पवार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सखुबाई दशरथ शिंदे (वय ३२, रा. थेरगाव, सध्या रा. भोसरी) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळत आणि खेळवून घेत होती. पोलिसांनी डांगे चौक येथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह एकूण एक हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
‘चिमणी पाखरू’ जुगारावर पोलिसांचा छापा
