पुणे(pune)-मावळमध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पावसाने जनजीवन विस्कळीत.
मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात एका घरावर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत तिघांना प्राण गमवावे लागल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध आणि मदतकार्य सुरू आहे.
लोणावळ्यात अवघ्या 24 तासांत तब्बल 625 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विक्रमी पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, काही इमारती आणि बंगल्यांच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, बाधित भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू आहे.
