“मी कुठेही जाणार नाही; शिवसेना या संकटातून बाहेर पडेल”– खासदार राजाभाऊ वाजे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. “मी कुठेही जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमधून शिवसेना बाहेर पडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या स्वागत कार्यक्रमात बोलताना वाजे म्हणाले, “आज माझे जे स्वागत झाले, तो माझा दुसरा विजय आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त दोन वेगवेगळे वर्धापनदिन साजरे होत असल्याचे दुःख आहे. मी शिवसेना एक असताना आमदार होतो, तर आता दोन शिवसेना असताना खासदार आहे.”

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पक्ष संघटना पुन्हा मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *