पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : स्वतःचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देऊन देशभरातील १३ नागरिकांची सुमारे २८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोन एजंटच्या विरोधात गुनहा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते १४ जानेवारी २०२६ एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.
प्रदीप अशोक राठोड (वय ३९, सध्या रा. विजयनगर, काळेवाडी, मूळ रा. दिघी रस्ता, भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप रोठोड याने चिंचवड येथील ‘जिनियस इंटरप्रायजेस’च्या नावावरील खात्यातून ९३ लाख ६२ हजार २५७ अधिक रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. या व्यवहारांचा वापर विविध सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी १३ नागरिकांची २७ लाख ९३ हजार ८१९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
सायबर टोळीला बँक खाते देणारा लोन एजंट जेरबंद; १३ जणांची २८ लाखांची फसवणूक
