पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जमिनीच्या लेव्हलिंगचे काम थांबवण्यास सांगितल्याने एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (३ मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील गडद परिसरात घडली.
गणपत कोंडू शिंदे (वय ६५, रा. गडद, माळवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सखाराम कोंडू शिंदे, मंगेश सखाराम शिंदे, आमिर सखाराम शिंदे (सर्व रा. गडद, माळवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि जेसीबी चालक विलास देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या जागेत आरोपी जेसीबीने जमीन लेव्हल करत असल्याचे पाहून फिर्यादीने त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने सखाराम शिंदे याने शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच मंगेशने दगड मारून तर आमिरने काठीने पाठीवर मारून जखमी केले. फिर्यादी तक्रार देण्यासाठी जात असताना जेसीबी चालक विलास देशमुख याने त्यांना धमकी देत कानशिलात लगावली. उत्तर महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
जमिनीच्या वादातून भाऊ, पुतण्यांकडून मारहाण
