Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-​चिंचवडमधील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मध्ये भीषण आग; एसी फुटल्याने वर्गखोली धुराने भरली

By Sumedh Chapalgaonkar
May 21, 2026 1 Min Read
0

(pimpri chinchwad)-​चिंचवडमधील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मध्ये भीषण आग; एसी फुटल्याने वर्गखोली धुराने भरली

​एमआयडीसीतील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मधील घटना; अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला

पिंपरी-चिंचवड :
चिंचवड एमआयडीसी परिसरातील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मध्ये बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेतील एसी फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही क्षणांतच वर्गखोलीतून धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे तसेच शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्यानेमोठा अनर्थ टळला.

ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास घडली. एमआयडीसी, ब्लॉक-सी येथील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’च्या पहिल्या मजल्यावरील एका वर्गखोलीमध्ये एसीमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणांतच आग भडकली. वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर असल्याने आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण केले.
आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला. शाळा परिसर धुराने भरून गेल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगाने परिस्थिती नियंत्रणात घेत पाण्याचा मारा सुरू केला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर जवानांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोल्यांचे दरवाजे व खिडक्या उघडून आतमध्ये साचलेला धूर बाहेर काढला.
सुदैवाने घटना घडली त्यावेळी शाळा बंद होती. त्यामुळे वर्गामध्ये कोणताही विद्यार्थी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, वर्गखोलीतील फर्निचर आणि विद्युत साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शाळांमधील विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसी आणि विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांकडून जवानांचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags:

Massive Fire at Empros International School in Chinchwad Classroom Fills with Smoke After AC Explodes
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

पवना नदीचे पाणी धोकादायक बंदिस्त जलवाहिनीसाठी बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next

खाकीतील ‘देवदूत’! चिंचवड पोलिसांची कमाल; मुंबईच्या गर्दीतून शोधल्या २ चिमुरड्या, आई-वडिलांची झाली गळाभेट

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme