पिंपरी-चिंचवड :-
जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्यात ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर थेट खुनात झाले! मावळमधील जाधववाडी येथे पुतण्याने चुलत्याचा काटा काढल्याने खळबळ उडाली आहे.
📌 नेमकी घटना काय?
स्थळ: जाधववाडी, ता. मावळ.
वेळ: रविवारी रात्री ११:०० वाजता.
कारण: जमिनीचे वाटप आणि ५ लाखांच्या पैशांचा वाद.
👤 मृतक: रवींद्र रमाकांत जाधव (वय ४५).
👤 आरोपी: विशाल सुखदेव जाधव (पुतण्या) व इतर ३ साथीदार.
⚔️ वादाचा शेवट रक्ताने!
जाधव कुटुंबात १ एकर ९ गुंठे जमिनीवरून वाद होता. पाईपलाईनचा मोबदला म्हणून मिळालेल्या ५ लाखांवरून भांडण झाले. संतापलेल्या पुतण्याने कोयत्याने चुलत्यावर वार केले. रवींद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
⚡ पोलिसांची कारवाई:
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल जाधवला पकडले आहे. इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
✅ तपास पथक: तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन.
#CrimeNews #MavalCrime #PimpriChinchwad #PoliceAction #BreakingNews #CrimeUpdate #BreakingNewsPimpri
