​दापोडीतून १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

​पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून तब्बल १० लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास दापोडी येथील जुन्या पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर करण्यात आली.
आर्यन रविंद्र यादव (वय २०, रा. न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे) आणि शोएब शकिल शेख उर्फ वस्ताद (वय २५, रा. रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई रणधिर रमेश माने यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदामाचे पोहे हॉटेलसमोर दोन्ही आरोपी एका दुचाकीवर बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ९८.५६ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ घेऊन चालले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ड्रग्ज, दुचाकी आणि मोबाइल जप्त केला असून हे ड्रग्ज त्यांनी गणेश पेठेतील शोएब शेख नामक इसमाकडून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *