टाटा टोयो कंपनीतून लाखो रुपयांच्या सुट्या भागांचा अपहार; पिकअप चालकावर गुन्हा

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – कंपनीचे साहित्य इतरत्र पोहचवण्याची जबाबदारी असताना चालकाने विश्वासघात करून साहित्याचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जुलै ते २० जुलै २०२६ दरम्यान कोरेगाव येथील टाटा टोयो रेडिएटर्स लिमिटेड कंपनीत घडली.
याबाबत उमेश चंद्रकांत शिंदे (४३, ब्राह्मणवाडी, वडगाव मावळ, पुणे) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक अनिल पांडुरंग शिर्के (२७, टाकवे बुद्रुक, मावळ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कंपनीचे साहित्य वाहतुकीसाठी विश्वासाने दिले होते. मात्र, त्याने ते साहित्य कंपनीत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून ठेवले. यामध्ये फॅन मोटर श्राउड असेंब्लीचे ७७ हजार १२६ रुपये किमतीचे साहित्य आणि इतर माल मिळून अपहार केला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *