Mumbai-ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधव-मिलिंद नार्वेकर आमनेसामने

मुंबई : ठाकरे गटातील सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे पक्षातील वातावरण तापल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावर मिलिंद नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून बोचरी प्रतिक्रिया दिली. नार्वेकर यांच्या पोस्टनंतर पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

ठाकरे गटाला खासदारांच्या संभाव्य बंडखोरीचे आव्हान असतानाच वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद उघड झाल्याने पक्ष नेतृत्वासमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *