मुंबई : मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावताच शहरातील वातावरण आल्हाददायक झाले. पावसानंतर मरीन ड्राइव्ह आणि चौपाटी परिसरात आकाशात इंद्रधनुष्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाल्याने नागरिक आणि पर्यटकांची गर्दी झाली.
समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी या मनमोहक क्षणाचा आनंद घेत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. काळ्या ढगांमधून डोकावणारे रंगीबेरंगी इंद्रधनुष्य मुंबईकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.
हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून, लवकरच मान्सूनचे अधिकृत आगमन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
