मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सचिन अहिर यांच्यावर सातत्याने होत असलेल्या ‘गद्दारी’च्या आरोपांनंतर आता त्यांच्या कन्या किरण अहिर शाह यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका घेतली आहे. वडिलांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या सडेतोड प्रत्युत्तर दिले.
ठाकरे गटाकडून “पक्षाने सर्व काही दिले, तरी ऐनवेळी साथ सोडली” अशा शब्दांत सचिन अहिर यांच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर किरण अहिर शाह यांनी समोर येत वडिलांवरील आरोपांना उत्तर दिले. त्यांनी आपल्या भूमिकेतून सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा बचाव करत, सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
किरण अहिर शाह यांच्या या प्रतिक्रियेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, ठाकरे गट आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे.
