म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे मुंबईत आगमन; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून स्वागत

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, म्यानमारचे भारतीय राजदूत अभय ठाकूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्यानमारचे महावाणिज्यदूत मोहनराव पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *