सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – जावयाला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून नऊ लाख रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे २९ सप्‍टेंबर २०२४ ते २० जुलै २०२६ या कालावधीत घडली.
संजय श्रीरंग सोनोने (रा. पातुर, जि. अकोला) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मारूती मुकींदा शिकरे (वय ६५, रा. जगताप इस्टेट, पिंपळे गुरव) यांनी सोमवारी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या जावयाला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी ९ लाख रुपये स्वीकारले. मात्र, कोणतीही नोकरी न देता आणि पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक व रकमेचा अपहार केला. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *