पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे-महिंद्रा रोड परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रतीक उमेश बोचरे (वय २१, रा. मेदनकरवाडी, चाकण) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक बोचरे हा ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे बाळगताना मिळून आला. शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई असताना त्याने बेकायदेशीररीत्या हे शस्त्र जवळ ठेवले होते. दक्षिण महाळुंगे पोलीस हवालदार गाडीलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पिस्टलसह एकाला गुन्हे शाखेकडून अटक
