ठाणे : ठाण्यात मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे झाड कोसळून पांडुरंग भुवड गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
या घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक झाडे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
