Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

By Sumedh Chapalgaonkar
July 24, 2026 2 Min Read
0

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची सायबर फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी, हिंजवडी, निगडी, देहूरोड, चाकण दक्षिण आणि तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवशी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
भोसरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चिंतामणी सिध्दप्पा पुजारी (रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) याने बनावट खाते उघडून ३ नागरिकांची १ लाख ८० हजार ३४६ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. एका महिला आरोपीने सायबर टोळीशी संगनमत करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा गैरवापर करत एनसीसीआरपी पोर्टलवरील ९ तक्रारींमधील ६ लाख ९७ हजार रुपये एटीएमद्वारे काढून घेतले. पोलीस शिपाई महेश दवंगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात दिलेल्‍या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निगडी प्राधिकरणातील आयडीएफसी बँकेच्या खात्याचा वापर करून आदेश दत्तात्रय गिरी व त्याच्या साथीदारांनी कर्नाटकातील एका तक्रारदाराचे २ लाख २० हजार रुपये चेकद्वारे काढून घेतले. पोलीस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देहूगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्वतःचे खाते सायबर फसवणुकीच्या व्यवहारासाठी वापरू देणाऱ्या ओंकार राजेंद्र मोरे (वय २१, रा. माळवाडी, देहूगाव) या तरुणावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, महिला पोलीस शिपाई अश्विनी पसपुल (वय ३३) यांनी देहूरोड पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. आरोपीने तब्बल १३ लाख ४० हजार १ रुपयांचे अवैध व्यवहार केले आहेत.
चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात आरोपींनी आयडीएफसी फर्स्ट बँकेतून सायबर फसवणुकीची १३ लाख ८० हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे, तर मेदनकरवाडी व नाणेकरवाडी परिसरातील एटीएममधून १० लाख ६० हजार रुपये रोख स्वरूपात काढून शासनाची व तक्रारदारांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस शिपाई महादेव बिक्कड व विशाल बंड (रा. चाकण दक्षिण पोलीस ठाणे) यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. तळेगाव दाभाडे येथे किरण राजेंद्र शिंदे (वय ३६, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) याने सलून व स्वतःच्या नावे बँक खाती उघडून देशातील ७ नागरिकांची ६ लाख १० हजार १६५ रुपयांची फसवणूक केली. पोलीस शिपाई इंद्रभान इंगळे (वय ३०) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरटे सर्वसामान्यांना व तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात किंवा गैरवापर करतात. फसवणुकीची रक्कम त्याद्वारे काढून घेतात. या सर्व फसवणूक प्रकरणी भोसरी, हिंजवडी, निगडी, देहूरोड, चाकण दक्षिण आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सविस्तर तपास करीत आहेत.

Tags:

Pimpri-Chinchwad: Cyber ​​scam worth crores of rupees involving the misuse of bank accounts; six separate cases registered in Pimpri-Chinchwad city.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Next

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme