जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फळझाडांचे वृक्षारोपण

“एक झाड लावणे म्हणजे पृथ्वीला दिलेली सर्वात सुंदर भेट.”
५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व 5th Battalion NDRF, सुदुंब्रे व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने NDRF कॅम्प परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या प्रसंगी NDRF चे सर्व अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. NDRF च्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी, डिस्ट्रिक्ट टीम मेंबर,आयपीपी रो. किरण ओसवाल, व्हाईस प्रेसिडेंट रो. प्रशांत ताए, सेक्रेटरी रो. प्रदीप टेकवडे, मेडिकल डायरेक्टर रो. सौरभ मेहता, एन्व्हायरमेंट डायरेक्टर रो. महेश कुंभार, या सर्वांचे एन डी आर एफ तर्फे फुल देऊन स्वागत करण्यात आले तसेच NDRF चे वरिष्ठ अधिकारी ट्याय सी सरोज कुमार सर प्रमोद कुमार सिंग डेप्युटी कमांडर प्रवीण धटे असिस्टंट कमांडर सारंग सुर्वे असिस्टंट कमांडंट जस्टिन जोसेफ असिस्टंट कमांडर
संतोष चव्हाण डेप्युटी कमांडंट श्री योगेश कुमार एस एम सर
मान्यवर उपस्थित होते
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित केले.
“झाडे लावा, झाडे जगवा; हरित भारताचे स्वप्न साकार करा.”
“आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल NDRF प्रशासन व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *