नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत एक संवेदनशील निर्णय घेतला. दुपारी १.१५ वाजता विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ निवासस्थानी रवाना न होता विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला.
दुपारी २ वाजता नीट (NEET) परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी पंतप्रधानांनी आपल्या ताफ्याच्या हालचाली काही काळ पुढे ढकलल्या. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडू नये, याची काळजी घेण्यात आली.
सुमारे ४५ मिनिटे विमानतळावर प्रतीक्षा केल्यानंतर परीक्षा सुरू झाल्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी रवाना झाले. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
