पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा

पिंपरी येथील विठ्ठलनगर भागात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (२३ मे) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

सलीम उर्फ खबुला मकबुल पटेल (३६, चिखली), प्रतीक बाळकृष्ण बगाटे (२८, पिंपरी), उमेश सटवा सरवदे (३२), किरण मारुती कांबळे (३८), इस्माईल गुलाब शेख (२३), रोहित प्रभाकर शिंदे (२५), सूरज विजय घोडके (३४) आणि आकाश युवराज रणखांबे (३०, सर्व रा. पिंपरी) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार जावेद मुजावर यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठलनगर येथील पत्राशेड परिसरात स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र जमून पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह ३५ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम आणि ४५ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन असा एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *