Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

अवैध दारूविरोधात पोलीसांचा निर्णायक एल्गार; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अँटी बुटलेगिंग कक्ष’ सक्रिय

By Team News Beez
June 6, 2026 2 Min Read
0

फुगेवाडी दारूकांडानंतर कठोर पाऊल; दारू माफिया, पुरवठादार आणि संरक्षण देणाऱ्यांवरही करडी नजर

पिंपरी–चिंचवड :
फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने हादरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अवैध दारू व्यवसायाविरोधात आता सर्वात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. अवैध दारूचे उत्पादन, वाहतूक, साठवण आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्र ‘अँटी बुटलेगिंग कक्ष’ स्थापन केला आहे. विशेष म्हणजे, या कक्षाची नजर केवळ दारू माफियांवरच नाही तर त्यांना पाठबळ देणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्यांवरही असणार आहे.

फुगेवाडी येथील विषारी दारूकांडात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध दारू व्यवसायाच्या मुळावर घाव घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील हातभट्टी, बनावट मद्यनिर्मिती आणि दारू तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष पथकाला व्यापक अधिकार देण्यात आले आहेत.

नव्या कक्षाचे नियंत्रण थेट गुन्हे शाखेकडे राहणार आहे. या पथकात एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. पथकाच्या कामकाजासाठी आवश्यक वाहने, मनुष्यबळ आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) यांच्याकडे असेल. तर संपूर्ण कारवाईवर पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांचे थेट पर्यवेक्षण राहणार आहे.

यापूर्वीच्या कारवायांमध्ये प्रामुख्याने किरकोळ विक्रेते किंवा दारूचा साठा जप्त करण्यापुरतीच मर्यादा होती. मात्र आता अवैध दारूचा उगम, पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण रॅकेटचा तपास केला जाणार आहे. दारू व्यवसायामागील सूत्रधार, आर्थिक पाठबळ देणारे घटक आणि संपूर्ण जाळे चालवणारे मास्टरमाइंड यांच्यापर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे.

अवैध दारू व्यवसायात वारंवार सहभागी होणाऱ्या सराईत गुन्हेगारांची स्वतंत्र नोंद तयार करण्यात येत आहे. त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. गरज पडल्यास तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई आणि इतर कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. मोठ्या स्वरूपाच्या दारू तस्करीच्या गुन्ह्यांचा तपासही या कक्षाकडे सोपविला जाणार आहे.
या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस दलातील गैरप्रकारांना आळा घालणे. अवैध धंद्यांना संरक्षण देणे, आर्थिक लाभ घेणे किंवा कारवाईकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. अशा तक्रारी अथवा पुरावे आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध धंद्यांशी संगनमत करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. फुगेवाडी दारूकांडानंतर सुरू झालेली ही कारवाई केवळ धंदे बंद करण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण अवैध साखळी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai -मराठा समाजासाठी मोठी खुशखबर! OBC प्रमाणे मिळणार ८ शैक्षणिक सवलती; हजारो विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ

Next

विधान परिषद निवडणुकीत बाजार मांडला गेला, ७० टक्के लोक विकले गेले,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme