pune-क्षणभराचा थरार! विहिरीच्या काठावर अडकली विद्यार्थ्यांनी भरलेली बस

पुणे : हडपसर-सासवड रोडवरील वडकी परिसरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मोडक इंटरनॅशनल स्कूलची सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस विहिरीत पडता पडता बचावल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ पोहोचली असता चालकाचा ताबा सुटल्याने किंवा रस्त्याच्या परिस्थितीमुळे बसचा तोल गेला. मात्र बस विहिरीत कोसळण्यापूर्वीच अडकल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *