​खोटे सोने तारण ठेवून रुपीक कॅपिटल कंपनीची साडेतीन लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – खोटे सोने तारण ठेवून एका फायनान्स कंपनीची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ मार्च २०२६ रोजी चिंचवड येथील एम्पायर स्केवयरमधील साऊथ इंडियन बँकेच्या शाखेत घडली.
वैभव ध्यानकुमार कांबळे (वय २६, रा. सायली कॉम्पलॅक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. प्रशांत प्रताप मोरे (वय २५, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रुपीक कॅपिटल कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर आहेत. आरोपीने जुने कर्ज टेक ओव्हर करण्याच्या बहाण्याने कंपनीकडून ३ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन घेतले. मात्र, त्याने बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे कडे खोटे असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. संत तुकाराम नगर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *