दुचाकीच्‍या धडकेत सेक्युरिटी गार्ड जखमी

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडून थांबलेल्या एका सेक्युरिटी गार्डला भरधाव दुचाकीने धडक दिली. ही घटना २९ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर बावधन येथील डोरा फर्निचर दुकानासमोर घडली.
या प्रकरणी (एमएच ०४ एमएल ८८५०) या दुचाकी वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मसुदमिया अली (वय ५९, रा. संगमवाडी, पुणे. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बावधन येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी पाषाण तलाव सर्व्हिस रोडवरून हायवे क्रॉस करून सातारा लेनवर थांबले होते. दरम्यान, वाकड बाजूकडून येणाऱ्या दुचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादींना जोरात धडक देऊन जखमी केले. पुढील तपास बावधन पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *