Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

सिंगापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.२७ कोटींचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त

By Team News Beez
June 8, 2026 2 Min Read
0

: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला तब्बल १ कोटी २७ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून एका सहाचाकी कंटेनरसह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोवा राज्य निर्मित मद्याची महाराष्ट्रात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची माहिती विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार सासवड विभागाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून बेलसर-वाघापूर मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली.
तपासणीदरम्यान सिंगापूर गावच्या हद्दीत हॉटेल दोस्तीसमोर संशयित कंटेनर क्रमांक एन.एल.-०१ एन.-७६२३ थांबविण्यात आला. वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिल्याने वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये वाहनातून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या तब्बल ६१ हजार ९२० सीलबंद बाटल्या (१,२९० बॉक्स) आढळून आल्या.
या मद्यसाठ्याची किंमत १ कोटी ११ लाख ४५ हजार ६०० रुपये इतकी असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा कंपनीचा एलपीटी-१६१५ मॉडेलचा कंटेनर, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी २७ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीसंदर्भातील कोणताही वैध परवाना, वाहतूक पास किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच हा मद्यसाठा महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी कैलाशकुमार नानजी पटेल याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ)(ई), ८०, ८१, ८३, ९०, १०३ व १०८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८/२०२६, दिनांक २ जून २०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत निरीक्षक एस. एस. बरगे, शिरूर विभागाचे निरीक्षक झेंडे, पी. एम. मोहिते, दुय्यम निरीक्षक पी. जे. मेहता, गिरीश कर्चे, सागर साबळे, मनोज होलम तसेच जवान दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, मोहन गवळी, बाळू आढाव, तानाजी काळे, गणेश जाधव आणि सागर दुबळे यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एस. एस. बरगे, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग, हे करीत आहेत. या कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील अवैध मद्य तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai-राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; सुनील तटकरे यांची घोषणा

Next

नाशिक भेटीत शहराच्या अवस्थेबाबत नताशा आव्हाड यांची तीव्र प्रतिक्रिया; कुंभमेळा तयारीवर प्रश्नचिन्ह

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

CATEGORIES

  • Uncategorized (464)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (884)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
July 25, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनामुळे नवी दिल्ली...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी(pimpri) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme