ऑनलाइन प्रॉडक्ट ट्रेडिंगच्या नावाखाली 23 लाखांचा गंडा

पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – 20 टक्के नफ्याचे आमिष दाखवून सोशल मीडिया व ऑनलाइन वेबसाईटद्वारे एका व्यक्तीची 23 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना वाकड येथे 25 मे ते 15 जून 2026 या कालावधीत घडली.
हितेश ललवानी, प्रमिला सचदेव व संयुक्ता (पूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पुरुष फिर्यादीने बुधवारी (दि. 24 जून) रोजी वाकड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टेलिग्राम आणि व्हॉट्सप चॅटवरून र्मींळपलशेषषळलळरश्र.ेपश्रळपशफ या वेबसाईटद्वारे गुंतवणुकीवर भरघोस नफा देण्याचे आमीष दाखवले व 23 लाख 88 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून अपहार केला. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *