Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

संघर्ष, जिद्द आणि परिश्रमातून मिळविले डॉक्टरेटचे स्वप्न

By Team News Beez
May 27, 2026 2 Min Read
0

प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून तसेच कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपत श्री. बाबासाहेब लक्ष्मण काळे यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अर्थशास्त्र या विषयांमध्ये “आदिवासी समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास” या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. ग्रामीण भागातील पश्चिम भागात स्थित असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम होतो, याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच आदिवासी अर्थव्यवस्था यांना स्थिर अवस्था प्राप्त करून देण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी करण्यासाठी अत्यावश्यक उपायोजना व शासकीय उपाय योजना यावर त्यांनी सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधन कार्याला डॉक्टर गव्हाळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समाजाभिमुख आणि अभ्यासपूर्ण संशोधनामुळे त्यांच्या प्रबंधाचे शैक्षणिक क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे. हे संशोधन कार्य करत असतानाच श्री बाबासाहेब काळे यांनी आपल्या नोकरीच्या कार्यक्षेत्रातील अनेक गरजू व गरीब मुले दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हातभार लावला. त्याचबरोबर आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी कोणत्याही आवश्यक सुविधा नसतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही.  कुटुंबीयांचा आधार, स्वतःची मेहनत आणि शिक्षणावरील निष्ठा यांच्या बळावर त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. नोकरी सांभाळत संशोधन करणे हे मोठे आव्हान असतानाही त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत नियत कालावधीमध्ये संशोधन पूर्ण केले. हे याबद्दल पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख मा. सुरभी जैन, व्हाईस व्हायवाच्या चेअरमन मा. अमिता यादवाडकर तसेच  ग्रंथालय व प्रकाशन विभागाच्या प्रमुख मा. शुभदा नगरकर व विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यांनी श्री बाबासाहेब काळे यांनी  सादर केलेल्या व संशोधित केलेल्या विषयाचे मनापासून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक व पर्यावरणीय विषयांचा सखोल अभ्यास करत त्यांनी संशोधनाला वास्तववादी स्वरूप दिले. संशोधनासाठी विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेटी, सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचे कार्यही त्यांनी मोठ्या परिश्रमाने पूर्ण केले. हे संशोधन कार्य करत असतानाच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संशोधन पेपर प्रसारित केलेली आहे त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे “Global Economic Trends” हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेला तसेच “Rural Development and Self Empowerment: Issues and Challenges” हा राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेला संशोधन पेपर संशोधनाला नवी दिशा देणारा आहे.
त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
श्री. बाबासाहेब लक्ष्मण काळे हे पिंपरी चिंचवड शहरातील रहवासी असून त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, परिश्रम आणि शिक्षणावरील विश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

Tags:

Mr. Babasaheb Laxman Kale
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

महात्मा फुले नगरात इलेक्ट्रिक पॅनल बोर्डाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Next

पानटपरीतून ३७ हजारांचा गांजा जप्त

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme