जनतेच्या हक्कासाठी सभागृहात उठवलेला आवाज यशस्वी… ‘अण्णा भाऊ साठे महामंडळ’ अपहार प्रकरणातील दोषींवर अखेर कारवाई!

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मी सभागृहात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळा’मधील अपहाराबाबत ‘विशेष उल्लेख सूचना क्रमांक १०८’ द्वारे प्रश्न उपस्थित केला होता. महामंडळातील गैरव्यवहार आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या पैशांची झालेली लूट अजिबात खपवून घेतली जाणार नाही, हीच माझी स्पष्ट भूमिका होती.

माझ्या या प्रश्नाला आता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अधिकृत लेखी उत्तर प्राप्त झाले आहे. मला अत्यंत समाधान वाटते की, आपल्या या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

चौकशी समिती गठीत: महामंडळ स्तरावर या अपहाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.

दोषींवर निलंबनाची कारवाई: चौकशी समितीच्या अहवालानुसार श्री. ठाकूर आणि श्री. नाडे हे दोषी आढळले असून, त्यांना ०१/०१/२०२६ पासून निलंबित करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल: या संपूर्ण अपहार प्रकरणी २६/०२/२०२६ रोजी जालना येथे रीतसर गुन्हा (FIR) देखील दाखल करण्यात आला आहे.

गोरगरीब, वंचित घटकांच्या कल्याणासाठी असलेल्या महामंडळांमध्ये अशा प्रकारचा कोणताही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. जनतेच्या पैशांचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येक दोषीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेपर्यंत माझा हा कायदेशीर लढा आणि पाठपुरावा असाच सुरू राहील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *