Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी ‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करा!- शंकर जगताप

By Sumedh Chapalgaonkar
July 2, 2026 2 Min Read
0

-विधिमंडळात ‘औचित्याच्या मुद्द्या द्वारे’ आग्रही मागणी

-प्रकल्पाचा खर्च आता १,७०० कोटींवर; विशेष निधी देण्याची विनंती

– शहराचे भविष्यातील संभाव्य पाणीसंकट टाळण्यासाठी प्रकल्प ठरणार गेमचेंजर

पिंपरी, २ जुलै (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘पवना बंद जलवाहिनी प्रकल्प’ विहित कालमर्यादेत आणि तातडीने पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळात ‘औचित्याच्या मुद्द्या द्वारे’ केली. या रखडलेल्या प्रकल्पासाठी शासनाने विशेष निधी आणि आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या जलद गतीने उपलब्ध करून द्याव्यात, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

आमदार शंकर जगताप यांनी सभागृहात शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, पवना धरण ते निगडी सेक्टर-२३ जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे ३६ किलोमीटर लांबीची आणि १८०० मिमी व्यासाची बंद जलवाहिनी उभारण्यासाठी सन २००८ मध्ये ३९७.९२ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, स्थानिक आंदोलन, जमीन संपादनातील अडचणी, प्रशासकीय व तांत्रिक अडथळे, तसेच विविध न्यायालयीन व लवाद प्रक्रियांमुळे हा प्रकल्प गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडला आहे.
—————————

१५ वर्षांत फक्त ४.५ ते ८ किमीचे काम!

या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे १७१ ते २०० कोटी इतका खर्च झाला असून, केवळ ४.५ ते ८ किलोमीटरपर्यंतचेच जलवाहिनीचे काम पूर्ण होऊ शकले आहे. तर सुमारे २८ ते ३२ किलोमीटरचे काम अद्याप प्रलंबित आहे. अनेक वर्षांच्या विलंबामुळे आणि वाढत्या बांधकाम खर्चामुळे या प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत आता तब्बल १,२०० ते १,७०० कोटींवर पोहोचली आहे. हा वाढीव खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने यासाठी विशेष आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
——————————

वार्षिक १.२९ टीएमसी पाण्याची होणार बचत

आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले , सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून दररोज सुमारे ५१० ते ५३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. हा बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास खुल्या कालव्यातून आणि पात्रातून होणारे बाष्पीभवन, पाण्याची गळती व अनधिकृत पाणीउपसा पूर्णपणे रोखता येईल. यामुळे शहराला अतिरिक्त सुमारे १०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असून, वार्षिक अंदाजे १.२९ टीएमसी पाण्याची मोठी बचत होईल. शहराचे भविष्यातील संभाव्य पाणीसंकट टाळण्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
——————————–

प्रतिक्रिया :
“पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसे आणि हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी विशेष निधी मंजूर करावा आणि शासनाने एका निश्चित कालमर्यादेत हे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी मी केली आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा मी सातत्याने करत राहीन.”

शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

पाऊस वाढला… पण पवना धरणातील पाणीसाठा मात्र घटला; शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता कायम

Next

जनतेच्या हक्कासाठी सभागृहात उठवलेला आवाज यशस्वी… ‘अण्णा भाऊ साठे महामंडळ’ अपहार प्रकरणातील दोषींवर अखेर कारवाई!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme