पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – घरगुती वादातून एका 62 वर्षीय चुलत्याने आपल्याच पुतण्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना काळेवाडी येथील कृष्णा गार्डन सोसायटीमध्ये 1 जुलै रोजी घडली.
गणेश राजेंद्र पाखरे (वय 32) असे खून झालेल्या पुतण्याचे नाव आहे. संजय उमाजी पाखरे (वय 62) याला अटक केली आहे. रोशन उर्फ मयुर राजेंद्र पाखरे (वय 29, दोघेही रा. श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची वाटणी, नोकरी आणि पत्नी-मुले सोडून गेल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादीचा भाऊ गणेश पाखरे याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला. काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चुलत्याने केली पुतण्याची हत्या
