देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यू होत असून हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूत दाखल होणार असताना नदीतील ही गंभीर परिस्थिती पर्यावरणप्रेमी, वारकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. नदीपात्रात तरंगणारे आणि किनाऱ्यावर वाहून आलेले मृत मासे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण झाले आहेत. दरम्यान,
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, नदीतील वाढलेली जलपर्णी, दूषित सांडपाण्याचा विसर्ग, पाण्याची घटलेली पातळी यामुळे हजारो माशांचा मृत्यू होत आहे.
आषाढी वारीपूर्वी इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू; प्रदूषणाबाबत चिंतेची घंटा
