Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad ​हजारो कोटींचे बजेट, पण कलाकारांच्या नशिबी उकाडा! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लाजिरवाण्या कारभाराविरोधात कलाकारांचा संताप

By Team News Beez
June 14, 2026 2 Min Read
0

​पिंपरी-चिंचवड :
महानगरपालिकेचा कारभार आणि त्यांची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेचे हजारो कोटींचे बजेट असूनही, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात कलाकारांची जी कोंडी होत आहे, ती अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. ‘व्हीआयपी’ संस्कृती जपणाऱ्या महापालिकेला कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा मात्र पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र आहे.

​’व्हीआयपी’ चकाचक, कलाकार मात्र घामाघूम!
​नाट्यगृहात दोन व्हीआयपी (VIP) रूम्स आहेत, तिथे मात्र ३-४ उत्तम दर्जाचे एसी (AC) थाटामाटात लावण्यात आले आहेत. पण ज्या कलाकारांच्या दमावर हे नाट्यगृह चालते, प्रेक्षक गर्दी करतात, त्या कलाकारांच्या मुख्य मेकअप रूममध्ये मात्र एकही एसी नाही! उन्हाळ्याच्या दिवसांत या खोल्यांमध्ये साधी खेळती हवा देखील नाही. अशा अत्यंत कोंदट वातावरणात कलाकारांचा जीव नकोसा होत असून, त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​३-४ वर्षांपासून फक्त आश्वासनांची खैरात; प्रशासनाचे उत्तर ऐकून संताप अनावर!
​गेल्या ३-४ वर्षांपासून “एसी लावू, काम होईल” असे सांगून केवळ वेळ मारून नेली जात आहे. अखेर सहनशीलतेचा अंत झालेल्या काही कलाकारांनी जेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली की, “अजून मेकअप रूममध्ये एसी का लागले नाहीत?” तेव्हा कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते. “अजून टेंडर पास झाले नाही, फक्त चर्चा सुरू आहे. टेंडर बनेल, मग काम होईल… याला अजून काही महिने लागतील!” असे बेजबाबदार उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

​”शेवटी आमच्या मर्यादा संपतात.. सुधारणा करा! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याची तात्काळ दखल घ्यावी.”
— त्रस्त कलाकारांची सोशल मीडियावरील उद्विग्न हाक.

​सोशल मीडियावर व्यथा मांडली, संपूर्ण राज्यात नाचक्की!
​प्रशासनाच्या या ‘थंड’ कारभारामुळे त्रस्त झालेल्या कलाकारांनी आता थेट सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. एवढेच नव्हे तर थेट प्रेक्षकांसमोर जाऊन स्टेजवरून आपल्या मनातील तीव्र भावना आणि संताप व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या ढिसाळ आणि दुजाभावाच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पालिकेची प्रचंड नाचक्की होत आहे.

​आता तरी ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे होणार का?
​कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला कलाकारांसाठी एक एसी टेंडर काढायला काय तीन वर्षे लागतात का? असा जळजळीत सवाल आता रंगभूमीवरून विचारला जात आहे. व्हीआयपी नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना एसी हवेत, मग कलाकारांना का नाही? कलाकारांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे महापालिकेने आता ​या गंभीर प्रकरणाची पिंपरी चिंचवड महापालिकेने तात्काळ दखल घेऊन, टेंडरच्या फाईली बाजूला सारून युद्धपातळीवर मेकअप रूममध्ये एसी बसवावेत, अन्यथा कलाकारांचा हा संताप महापालिकेला जड जाईल, यात शंका नाही!

Tags:

Pimpri-Chinchwad: A budget worth thousands of croresyet artists are left to swelter in the heat! Artists outraged by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's shameful mismanagement.
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad पाऊस लांबल्याने राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ ऑगस्टपर्यंत सिंचनासाठी पाणीबंदी

Next

आषाढी वारीपूर्वी इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू; प्रदूषणाबाबत चिंतेची घंटा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme