गांजा विक्री करणार्‍या दोघांना अटक

पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – आळंदी येथील नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी बाळगणार्‍या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अटक केली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
विनयदीप गंगाधर मानवते (वय 29, रा. चिंबळी, खेड) आणि इस्माईल मकबुल पठाण (वय 25, रा. कुरुळी, खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई निखिल माणिक फापाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या ताब्यातून 16 हजार 850 रुपये किमतीचा 337 ग्रॅम गांजा आणि 60 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 76 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *