पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – बावधन येथील मुंबई सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24 जून) रोजी करण्यात आली.
आर्यन प्रकाश जाधव (वय 20, रा. बावधन, पुणे) आणि ओमकार संचिन मोरे (वय 30, रा. कोथरूड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी 1 लाख 22 हजार रुपये किमतीची बेकायदेशीर शस्त्रे स्वतःजवळ बाळगताना रंगेहात सापडले. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.
—
बावधनमध्ये दोन गावठी पिस्तूलांसह दोघे गजाआड
