नवी दिल्ली : ओमानच्या किनारपट्टीलगत आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खलाशांसाठी धोक्याची घंटा ठरलेल्या आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या व्यापारी जहाजावर अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याचे समोर आले असून, या मालिकेतील हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारत सरकारने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ आळा घालण्याची मागणी केली आहे.
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला; आतापर्यंत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला
