पुणे, दि. ८(pune) : वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रविवार दि. १० मे २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही विशेष कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.
यानुसार आळंदी रोड कार्यालय तसेच मौजे दिवे येथील कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
वाहन चालक, वाहनमालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयात वाहने तपासणीसाठी सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सर्व स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
