वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कडून मांडूळ सापाला जीवदान

वडगाव जवळ च्या भागात एका घरा बाहेर एक साप दिसून दिसून आला, निखिल नवघणे यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे केतीका कसेतवार यांना कॉल केला. तसेच लगेच वनविभाग वडगाव ची वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सभासद रौनक खरे, जिगर सोलंकी व वडगाव वनरक्षक पी. कासोळे जाग्यावर जाऊन त्या मांडूळ सापाला सुरक्षित रेस्क्यू केले आणि लोकांनी मध्ये जनजागृती केली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व वनपाल हिरेमठ तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सापाची पाहणी करून काही ईजा न असता त्याला लगेच सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडविण्यात आलं.
निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक असलेला ‘मांडूळ’ (Red Sand Boa) हा साप सध्या मानवी लोभ आणि अंधश्रद्धेमुळे मोठ्या संकटात आहे. या सापाला दोन तोंडे असतात, तो घरात असल्यास गुप्तधन मिळते किंवा त्याच्या वापरामुळे अमाप संपत्ती मिळते, अशा निव्वळ चुकीच्या अफवा बाजारात पसरवल्या जातात; मात्र विज्ञानाच्या दृष्टीने यात तथ्य नाही. मांडूळ हा पूर्णपणे बिनविषारी आणि अत्यंत शांत स्वभावाचा साप असून, त्याची शेपटी बोथट असल्याने दोन तोंडे असल्याचा भास होतो. उंदीर हे त्याचे मुख्य खाद्य असल्याने तो खऱ्या अर्थाने ‘शेतकरी मित्र’ आहे. अशा सापांची तस्करी करणे किंवा त्यांना जवळ बाळगणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून, यासाठी कडक कारावासाची तरतूद आहे. वन्यजीव संरक्षण मधील हा अनुसूची/ schedule १ species नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता निसर्गाचे रक्षण करावे आणि मांडूळ आढळल्यास तात्काळ सर्पमित्रांशी किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.
रौनक खरे
(वन्यजीव अभ्यासक)
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अधळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *