पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – आळंदी-चाकण रस्त्यावरील एका लॉजसमोर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत अडथळा निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे) रोजी सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी बुधवारी (दि. १३ मे) रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिले विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या (पिटा ॲक्ट) कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीराज चौक आळंदी येथील योगीराज लॉजसमोर आरोपी महिला येण्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव आणि शब्द उच्चारून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सभ्यतेचा भंग होत होता तसेच नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत होता. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सार्वजनिक सभ्यतेचा भंग प्रकरणी महिलेवर गुन्हा
