pimpri chinchwad-तळेगाव दाभाडे येथे मधमाशांच्या हल्ल्यात महिला जखमी
तळेगाव दाभाडे येथील तुकाराम नगर येथे एका महिलेवर तिच्या घराजवळ असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरील माशांनी अचानक हल्ला केला.
त्यात महिलेच्या चेहऱ्यावर माशा चावल्याने महिला जखमी झाली आहे, घटनेची माहिती मिळताच तळेगाव येथील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना हल्ल्यातून सुखरूप बाहेर काढले.
मदतीसाठी गेलेल्या अनिश गराडे यांना तसेच ॲम्ब्युलन्स चे चालक यांना ही मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे.
महिलेवर सध्या तळेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत