पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई २९ जून २०२६ रोजी दुपारी सव्‍वादोन वाजताच्‍या सुमारास ताथवडे येथील डांगे चौक ओव्हर ब्रिजजवळ फुटपाथच्या कडेला करण्‍यात आली आहे.
मनोज कुमार जोखईराम पाल (वय २६, रा. लोंढे वस्ती, ताथवडे. मूळगाव उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलीस हवाल्दार वंदु दत्तात्रय गिरे (वय ४५) यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. तसेच हत्यार बंदी आदेशाचा भंग केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *